आज पहाटे मला एक स्वप्न पडलं. माझी पहाट सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास होत असल्यामुळे त्याला दिवास्वप्न म्हटलं तरी चालू शकेल. कधीकधी मोबाईलची बॅटरी संपली की सकाळी मोबाईलमधलं गजराचं घड्याळ वाजतच नाही. मग मला पडलेली पहाटेची स्वप्नं मध्येच तुटत नाहीत. चालूच राहातात. स्वप्न तसं इंटरेश्टिंग असल्यामुळं त्यावर एक पोस्टच लिहू म्हटलं.
स्वप्नातला काळ साधारण तीन-चार वर्षांनंतरचा असावा. मी टोकियो डिस्नेलॅंडमध्ये फिरायला गेलो होतो. (मागच्याच आठवड्यात मी टोकियो डिस्नेलॅंड पाहून आल्यामुळे कदाचित मला स्वप्नातही तेच दिसलं असावं. पण म्हणून टोकियो डिस्नेलॅंड माझ्या मनात वसलंय असं मुळीच नाही.) फिरता फिरता मला अचानक आभ्या पाटील दिसला. मी त्याला हाक मारली. त्यानंही मला पाहिलं. त्याला भेटून खूप आनंद झाला. आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु झाल्या. एव्हाना आभ्याचं लग्न होउन त्याला मुलगाही झाला होता. पण अजूनही त्याच्या तोंडात 'सरां'चच नाव घोळत होतं. पण नंतर मला कळलं की राहूल हे त्याच्या मुलाचं नाव आहे. आमच्या गप्पा चालू असतानाच 'कॅय आहे?' असा कुठूनतरी आवाज आला. बघतो तर बनियन, बर्मुडा, पायात स्लिपर आणि एका हातात साबण घेउन निल्या कुलकर्णी आमच्याच कडे चालून येत होता.
"अरे निल्या, तू अशा अवतारात इथं?" मी आश्चर्यचकित होऊन विचारलं.
"विशल्या, त्याचं कॅय आहे माहितीये का, आमची शिश्टीम म्हणजे ओपन लूप शिश्टिम आहे. तुला आठवतंय का, आपण पुण्यात असताना मी जे.एम्. रोडवरच्या 'मॅक्डी'मध्ये पण बिनधास्त जायचो. त्यामुळं आता डिस्नेलॅंड वगैरेचं काही वाटत नाही." निल्या नेहमीच्या सुरात उत्तरला.
"अरे हो.. विसरलोच होतो. पण तुझ्या ओपन लूप शिश्टीमला अजून फीडबॅक लावला नाहीस का?" मी कुतूहलानं विचारलं.
"हे असंच चालू राहणार...याला फीडबॅक नाही लावता येत. त्यामुळे कुठेही गेलं तरी लाजायचं नाही. " निल्या.
आमच्या अश्या गप्पा चालू असतानाच मंद्या, आबा, महश्या, चंपी, मंग्या असा व्हॅलंटीनोचा एकेक मेंबर जमू लागला. बघता बघता सगळेच जमले. हे सगळे टोकियोत काय करताहेत असा विचार करतानाच कोणाच्यातरी डोक्यातून तिथल्या त्रिमितीय माहितीपटाला (3-D picture हो, आपल्या छोटा चंपीसारखा) जाण्याची आयडिया निघाली. मग सगळे तिथल्या थिएटरमध्ये घुसलो. माहितीपट तसा छोटाच होता. २० मिनीटांत संपला. संपल्यावर थिएटरमध्ये लाईट लागले. एका बाजूला कोणाच्यातरी सह्या घेण्यासाठी घेण्यासाठी खूप गर्दी झाली होती. जवळ जाउन बघितलं तर शश्या जोशीच्या सह्या घेण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ सुरु होती. एव्हाना तो प्रथितयश लेखक झाला होता. 'तो आमचा मित्र असल्यामुळे त्याच्यावर पहिला हक्क आमचा आहे' असं बाकीच्या लोकांना समजावून आम्ही त्याला गर्दीतून ओढून बाहेर घेउन गेलो. ब-याच दिवसांनी सगळे मित्र एकत्र भेटल्यामुळे सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. मग सगळेजण तिथंच भटकू लागलो. थोडं पुढे गेल्यावर अचानक D5 दिसलं. D5 समोरचं ग्राउंड पाहून सर्वांना nostalgia नं भरुन आलं. मग तिथंच क्रिकेटची एक मॅच होउन जाउदे असं क्रिकेटप्रेमींचं मत बनलं. पण निल्याला क्रिकेटमध्ये रस नव्हता. त्याला पत्त्यांचा डाव टाकायचा होता. क्रिकेटमधली काही मंडळी त्यानं पत्त्यांच्या बाजूनं वळवली आणि D5 मिडल लॉबीत त्यांचा डाव रंगला. इकडे समोरच्या ग्राउंडवर क्रिकेटचा डावही रंगला होता. नल्या बॅटिंग करत होता. आबा त्याला बॉलींग करण्यासाठी रनअप घेणारच होता पण तेवढ्यात चंबूरावांनी उजव्या हातानं सिगरेटचा झुरका घेत डाव्या हातानं त्याला थांबण्याची खूण केली. खेळ असा रंगलेला असताना का कुणास ठाऊक मला जाग आली. पाहतो तर साडेदहा वाजले होते. हे स्वप्न होतं हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. मला लॅबमध्ये जायला उशीर झाला होता. तरीही पुन्हा झोपल्यावर स्वप्न पुढे चालू होतं का पाहावं म्हटलं. पण स्वप्न काही पुढे सरकेना. चांगली स्वप्न पुन्हापुन्हा पडत नाहीत. पुन्हा एकदा भूतकाळात गेल्याचा आनंद जरा जास्तच झाल्यामुळं स्वप्नातून बाहेर पडायला थोडा वेळ लागला. ते विसरायच्या आत त्यावर एक पोस्टच लिहायचं ठरवलं.
'Gone are the days' अशी एक पोस्ट मंद्यानं यापूर्वी लिहीली आहेच. व्हॅलंटीनोचे मेंबर्स जगाच्या चार कोप-यात असताना आता असा प्रसंग आता प्रत्यक्षात घडेल की नाही माहित नाही. पण तो एकदा तरी घडावा अशी माझी मनापासून इच्छा आहे.
(या स्वप्नातले प्रसंग जसे मला आठवतायत तसे मी लिहीले. काही प्रसंग पुसट असल्यामुळे ते सविस्तर लिहीता आले नाहीत.)
3 comments:
भावा....एकदम व्हन्ट्टास स्वप्न आहे.
मनापासून आवडलं.
hey...this was very touching..wish your dream come true...
hey u refreshed all those college days man...every thing you wrote was to the perfection..thought as if it was moving infront of my eyes..cool..man execellent ..no words for this blog..keep up the great work...
vishal, this dream of yours had partially come true in california. I remember you telling me how you could meet four friends at the same place just by chance - abhijitchaugule, vikya, manya and somebody else. right?
Post a Comment