Monday, April 03, 2006
Studs in Stamford
So as per the plan on the fly, 2 Valentino studs (Me and Pashya Desai) met in Stamford, CT this week end. :)
पश्या भाड्याची (rental) गाडी घेऊन शुक्रवारीच स्टॅम्फर्ड मधे सचिन भिसेंच्या घरी धडकला, म्हणजे पोचला. (अमेरिकेत गाडी घेऊन खरोखर धडकणं हा श्रीमंती षौक आहे.) तिकडे तब्बल अर्धा डझन कोंबड्यांचा हुतात्मा दिन होता, आणि समारंभाला वीस-बावीस जण आवर्जून हजर होते.
आणि विवेकने मला नौगाटकला अस्सल मालवणी कोळंबी कालवण खायला नेलं.
शनिवारी भल्या पहाटे ८:३० वाजता पश्याने झोपमोड केली, काय तर म्हणे क्रिकेट खेळायचा प्लॅन आहे. मी, विवेक आणि तरुणने रात्री ४ वाजेपर्यंत पैसा-वसूल खाणं-पिणं आणि गप्पा केल्याने क्रिकेट खेळणं तर दूरच, पण बघणं पण शक्य नव्हतं. असा न तसा मला क्रिकेट्मधे रस कमीच आहे.. एकतर मी लवकर आऊट होतो, सगळ्यांना बॉलिंग दिली पहिजे असा काही क्रिकेट्मधे नियम नाही..(How undemocratic!), मग माझा खेळ क्षेत्ररक्षणापुरता मर्यादित राहतो.. बॅट्स्मनने मारलेला बॉलपण माझ्याकडेच फार वेगाने येतो (मॅग्नॅटिक पर्सनलिटी, दुसरं काय?). नाही; तसा एखाद्याने चौकार मारण्याला माझा विरोध अजिबात नाही, पण मग तो चेंडू सीमारेषेच्या थोडासाच बाहेर थांबावा अशी माझी माफक अपेक्षा असते.. सीमारेषेपलिकडे (खरंतर अलिकडे पण) ५० मीटर पळणं हा वेळेचा तद्दन दुरुपयोग आहे.
असो! ह्या विषयावर पश्याचा माझ्याशी मतभेद असल्याने तो खेळायला गेला आणि स्वत:चं करिअर स्टॅटिस्टीक आणखी एका देशात (आणखी) खराब करून घेतलं....वर म्हणे, तेल्या आला असता तर मला जरा मॉरल सपोर्ट मिळाला असता.. हम्मं.. तसाही नंतर सामन्याचा स्कोअर ऐकला तर एखाद्याला प्रश्न पडावा- हे क्रिकेट खेळले कि फूटबॉल?
शनिवारी दुपारी अखेर मी आणि विवेक नौगाटक वरून अमेरिकेचा मोस्ट सिनिक (scenic, not sinik) रस्ता - CT 8 वरून स्टॅम्फर्डला निघालो.. अर्थात तो रस्ता उन्हाळा आणि शरद ऋतूंत सुंदर दिसतो.. स्टॅंफर्ड मधे शिरतानाच त्या शहराने एकदम आपली छाप टाकली.. खरंच फार सुंदर शहर आहे. छोटंसंच इन मीन ४ एक्झिट मधे संपतं, पण चकाचक! देखण्या भारदस्त इमारती, प्रशस्त रस्ते, उद्याने, मैदाने .. आणि हवामान तर एकदम झकास..
शहरात पोहचल्यावर नेहमीप्रमाणे शेवटच्या टप्प्यात रस्ता चुकलो, मग रीतीनुसार, गाडीतले २ संगणक अभियंते(मी-विवेक), फ्लॅट्मधला एक(सचिन) आणि दुसरया गाडीतला एक (पश्या) ह्यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट, CMM-I प्रोसेसेस आणि 6-sigma मेथडॉलॉजीज ह्यांचा close to २० वर्षांचा (४ जणांचा प्रत्येकी ५ वर्षे) अनुभव + MapQuest, Google Maps, 2-3 मोबाइल कंपन्या ह्यांचे तंत्रज्ञान असं सगळं वापरलं आणि आम्ही अखेर ९५ मॉर्गन मॅनॉर, मॉर्गन मार्ग येथे पोहचलो.. ज्या लोकांना हे सगळं माहिती नसतं ते अमेरिकेत रस्ता कसा शोधतात देव जाणे ;)
सचिनचा सातारी आग्रह न मोडता आम्ही व्यवस्थित चहापान केलं. सगळेच जण "सर्वसाधारण वीज" (G.E.) साठी काम करणारे कंत्राटी कामगार असल्याने गप्पा साहजिकच कोणाचं काय काम चालू आहे, अलिकडे किती SLA बुडाले, आजकाल ऑफशोअरची लोकं कामच करत नाहीत मग त्याचा ऑनसाईट्च्या लोकांना कसा त्रास होतो अशा वळणाच्या होत्या. थोडे लोक तर गप्पा मारतानाही नेटवर्कमधे शिरून प्रॉडक्शन तपासत होते, काम करत होते. हल्ली कोणी जॉब बदलले, कोणाला किती मिळत असेल, कोणा संगणक-सुंदरींची लग्नं झाली ;) अशा गप्पा चालू होत्या..मधेच कोणाची कंपनी जास्त वाईट ह्यावर छोटासा वाद झाला.. (अशा वादात एकेकाळी मी जिंकायचो.. my first compny was incredibly bad ;) )..शेवटी सगळ्यांच्याच कंपन्या वाईट हयावर सहमती झाली..
सूर्यास्ताची वेळ होत आली होती, म्हणून समुद्रकिनारी जायची टूम निघाली. इथला बीचही फार सुंदर आहे.. जवळपास बगिचे पण बनवलेले आहेत.. खाडीच्या आजूबाजूला छोट्या, सुबक बंगल्या, त्यांची पाण्यात पडलेली प्रतिबिंबे एकूणच मन प्रसन्न करणारं द्रुश्य होतं. तिथले बरेच जण वीक-एन्ड च्या मूड्मधे होते. स्टॅम्फर्डचा समुद्र पूर्वेला आहे, पण सूर्य पश्चिमेलाच मावळतो, त्यामुळे आपल्याला कोकणासारखा समुद्रात बुडणारा सूर्य दिसू शकणार नाही हे आम्ही नंतर लॉजिकली कंक्लूड केले. अर्थात सूर्यास्ताचे शक्य नाही तर मग आम्ही आमचेच फोटो काढले. प्रशांतने तर १-२ काळोखाचेही फोटो काढले, बरे आले :p..
भारतीय उपहारगुहात जेवायला जायचा बेत होता, म्हणून आम्ही घाईघाईने घरी परतलो. परत सगळ्यांना फोनाफोनी, किती गाड्या न्यायच्या, कोणाकोणाला रस्ता माहिती आहे, कोण कुठ्ल्या गाडीत बसणार ह्याचं नियोजन झालं. चुकत माकत जेवायला पोहचलो.. जेवण खरच मस्त होतं आणि सचिन भिसेंसारखा दिलदार यजमान पण होता.. :p मग भीड न बाळगता संपूर्ण भारतीय पद्धतीने जेवण झालं, लोक अगदी हाताने भात कालवून जेवली.. जेवताना सगळ्या कॉमन मित्रांच्या आठवणी, चौकशा चालू होत्या. मी आणि पश्याने मंद्याला (एक अनुस्वार आहे म वर) मिस केलं..
जेवणानंतर अमेरिकेचे रात्रीचे जीवन कसे असते ह्या औत्सुक्यापोटी एक छोटा अभ्यास दौरा केला. सचिन, महेश आणि अनिल ह्यांनी आनंदाने मार्गदर्शन करण्याचे मान्य केलं.. पण नेमकं त्याच दिवशी Day-light saving सुरू होणार होतं त्यामुळे रात्रीतला एक तास कमी झाला.. १.५९ नंतर एकदम ३.०० वाजले आणि आम्हाला परत फिरावं लागलं.
दुसरया दिवशी सकाळी उठलो आणि निघायची गडबड सुरु झाली, मी आणि प्रशांत नौगाटकला निघालो, कारण विवेक आधीच परत गेला होता. जिकडे चुकूनही चुकणं शक्य नाही असे २ महामार्ग सोडले तर नकाशावरचे सगळे मार्ग चुकून मी आणि प्रशांत विवेकच्या घरी पोहचलो. त्याआधी "Difficulty of Map is exponentially proportional to number of stranger s/w professionals in the car" असा आम्ही एक सिद्धांत मांडला, आणि तो लगेच सिद्धदेखील झाला.. कारण आमचा अजून एक मित्र, अमित वरणगावकर, विवेकच्या घरी रस्ता (जास्त) न चुकता पोहचला पण तो त्याच्या गाडीत एकटाच होता, so map was not that difficult;). विवेकने बनवलेल्या अंडा-बुर्जी आणि चपातीवर सगळ्यांनीच तांव मारला. USA मधे चपाती बनवणे म्हणजे ती गरम तव्यावर ठेवणे आणि तिचा रंग काळा व्हायच्या आत उतरवणे होय. (त्याला फार कौशल्य लागतं राव)
आता परत जायची वेळ आली, आमचा आत्तापर्यंतचा गाडीचा अनुभव आणि घड्याळ बघून, विवेकने स्वत:च मला बॉस्टनच्या बसवर सोडायचा निर्णय घेतला आणि प्रशांतने त्याच्या माहितीच्या रस्त्याने परत जावं असं अमितनेही त्याला सूचवलं ;)..
हुरहुर लागणं म्हणजे काय हे पीटर पेन-बॉस्टन एक्सप्रेस मधे बसल्यावर कळालं, जुन्या मित्रांच्या भेटी-गाठी झाल्या, नवे मित्र मिळाले ह्याचा आनंद तर होताच, पण हा वीक-एन्ड एअवढ्या लवकर संपला ह्याचं वाईटही वाटत होतं... बघू परत कधी असा योग येतो, तोपर्यंत इमेल, सेलफोन आणि स्मृतीचित्रे आहेतच..
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
झकास लिहीतोस! मी आणि पश्या न्यूयॉर्कला गेलो होतो तेव्हा रस्ता चुकण्याचा प्रसंग अगदी असाच होता.
छान जमलंय वर्णन. मजा आली वाचून. असंच लिहीत राहा.
Post a Comment